‘व्हॅलेन्टाईन डे’ ला मनपा क्षेत्रातील गार्डन ‘कपल गार्डन्स’ म्हणून घोषित करा!

right to love

पुणे : राईट टू लव्ह संघटनेकडून प्रेम युगालांच संरक्षण करण्याची मागणी मनपा आयुक्तांना केली आहे. ‘व्हॅलेन्टाईन डे’ ची  पूर्व तयारी म्हणून संघटनेकडून निवेदन देण्यात आले. प्रेम करणाऱ्या जोडप्यांना भेटण्यासाठी योग्य व सुरक्षित जागा नसल्यामुळे नद्यालगतच्या ठिकाणी भेटावे लागते. त्यामुळे व्हॅलेन्टाईन डे ला मनपा क्षेत्रातील गार्डन ‘कपल गार्डन्स’ म्हणून घोषित करा मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.

प्रेम करणे हि नैसर्गिक प्रक्रिया असून प्रेम करणाऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे. आधुनिक युगात तरुण तरुणी बिनधास्त प्रेम करतांना दिसतात. मात्र संस्कृतीच्या नावाखाली प्रेमाला विरोध करणाऱ्या संस्कृती रक्षकांचा विरोध कमी होत नाही. पुण्यात सर्व सुख सुविधा उपलब्ध आहेत मात्र प्रेम करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षित ठिकाण नाही आहे. प्रेम करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा भाग असून धकाधकीच्या जीवनात प्रेम नसल्यामुळे अनेकांना एकटेपणा जाणवतो. संस्कृती रक्षकांकडून खूप वेळा प्रेम करणाऱ्या जोडप्यांना मारहाण व शिवीगाळ होत असते. तसेच काही ठिकाणी मुलींवर विनयभंगाचे प्रकार सुद्धा शहरात घळले आहेत, त्यामुळे महापालिकेने याबाबत निर्णय घ्यावा असे राईट टू लव्ह संघटने कडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.Loading…
Loading...