सरकारचा पत्रकारांना खुश करण्याचा प्रयत्न; पत्रकारांसाठी निवृत्ती वेतनाची घोषणा

नागपूर : आता राज्यातील पत्रकारांसाठी पेन्शन योजनेची घोषणा करण्यात आलीये. स्व. बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना असं या योजनेचं नाव असणार आहे.यासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. यापूर्वीही पत्रकारांसाठी निवृत्ती वेतनाची योजना होती मात्र पत्रकार हे खासगी कर्मचारी असल्याने त्यांना निवृत्ती वेतन देता येणार नसल्याचं सांगत २००५ मध्ये ही योजना बंद करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.

29 जूनला वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात एक बैठक घेतली होती . माहिती जनसंपर्क विभागाचे अधिकारी, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समिती व वित्त विभागाचे प्रमुख या वेळी उपस्थित होते. याच बैठकीदरम्यान या विषयावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान काल मंत्री मंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये स्व. बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी 15 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली.या निधीतुन ही योजना लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर पत्रकारांना खुश करण्यासाठीच हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

शेतकऱ्यांना अच्छे दिन; १४ पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ

पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूराला का ? धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल