लातूरच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर

पाकिस्तानी महिला झाली होती चक्क भारतात सरपंच

लातूर : जिल्ह्यातील 785 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रशासन विभागाच्या वतीने जाहिर करण्यात आला आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले होते.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निकाल 18 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. यानंतर सर्व विजयी उमेदवारांच्या नजरा आरक्षण सोडतीवर लागल्या आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी संध्याकाळी सरपंचपद सोडतीचा कार्यक्रम जाहिर केला. लातुर, औसा, रेणापूर. निलंगा, शिरूर, अनंतपाळ, उदगीर, जळकोट, चाकूर, अहमदपुर या नऊ तालुक्याची सोडत 29 जानेवारी रोजी तर देवणी तालुक्याची सोडत 1 फेब्रूवारी रोजी होणार आहे.

29 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता लातूर, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर, चाकूर, तालुक्यांची सोडत जाहिर होईल. तर दुपारी 3 वाजता रेणापुर, शिरूर, अनंतपाळ आणि जळकोट तालुक्याची सोडत काढली जाणार आहे. देवणी तालुक्यात रोजी सकाळी 10.30 वाजता जाहीर केली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या