पाऊले चालती पंढरीची वाट; पंढरपूर वारीचा कार्यक्रम जाहीर

टीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे : महाराष्ट्राची परंपरा व शान असलेली पंढरपूरच्या आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अवघ्या महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी संप्रदायात सर्वात मोठी आषाढी वारी असते. देहूवरून तुकोबारायांची पालखी व आळंदीहून ज्ञानोबांची पालखी "ज्ञानोबा तुकाराम" चा जयघोष करत पंढरपूरकडे प्रस्थान करत असते. पावसाळ्याच्या दिवसात अखंड पावसात पण वारकरी तल्लीन होऊन संपूर्ण भिजत सुद्धा विठुरायाच्या भजनात दंग असतात.

यावर्षी वारीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ६ जुलै रोजी ज्ञानोबारायांच्या पालखीचं आळंदीवरून तर तुकोबारायांची पालखी ५ जुलै रोजी देहूमधून प्रस्थान करणार आहे. १७ दिवसांचा प्रवास करून या पालख्या पंढरपूरमध्ये २३ जुलैच्या आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला २२ जुलै रोजी पंढरपुरात पोहचतील.

You might also like
Comments
Loading...