इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा

मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने पुढील दौऱ्यासाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा मागील आठवड्यात केली. यादरम्यान बीसीसीआयने शुक्रवारी १४ मे रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाचीही घोषणा केली आहे. एक कसोटी. ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्याची मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.

या दौऱ्यात एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत भारतीय संघाचे कर्णधारपद हे मिताली राज भुषवणार आहे. तर टी-२० संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरला देण्यात आले आहे. १६ जुनपासुन हा दौरा सुरु होणार आहे. १६ ते १९ जुन दरम्यान या मालिकेतील एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. तर २७, ३० जुन आणि ३ जुलैला एकदिवसीय सामने होणार आहे. तर टी-२० मालिका ही ९ ते १५ जुलै दरम्यान खेळवली जाईल.

प्रशिक्षक रमेश पोवार यांच्या नियुक्तीनंतर ही भारतीय महिला क्रिकेट संघाची पहिला दौरा आहे. यात रमेश पोवारची प्रशिक्षक म्हणून भारतीय महिला संघासोबत आधीची कामगीरी उल्लेखनिय नव्हती. तसेच डब्लु व्ही रमण यांना प्रशिक्षक पदावरुन हटवल्यानंतर आधीच वादाची स्थिती निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP