पाकिस्तानच्या रस्त्यांवर ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा!
इस्लामाबाद: पाकिस्तानात इम्रान खान यांनाच पंतप्रधान केलं जावं, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. इम्रान खान यांचं सरकार कोसळल्यानंतर शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू असताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात राजकीय तणाव निर्माण झालं आहे.
इम्रान खान यांच्याविरोधात परकीय शक्तींनी कारस्थान रचल्याचा आरोप करत त्यांचे लाखो समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. इम्रान खान यांना पुन्हा पंतप्रधान केलं जाव अशी मागणी केली आहे. अशातच काही ठिकाणी जमावाने ‘चौकीदार चोर है’ अशी घोषणाबाजी केल्या असल्याच्या पाहायला मिळाल्या.
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाचे खासदार शेख राशीद हे पाकिस्तानातील रावळपिंडी भागात सभेला संबोधित करत होते. याच सभेत लोकांनीकेली. या घोषणांचा रोख पाकिस्तानी लष्कराप्रमुखांकडे असल्याचे सांगितले जात आहे. खासदार शेख राशीद यांनी जमावाला शांत होण्याचं आवाहन केल्यानंतर ही घोषणाबाजी बंद झाली. तसेच अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने 174 मते पडल्याने इम्रान खान यांची पंतप्रधानपदाची खुर्ची गेली. या मागे लष्करप्रमुख बाजवा यांचा हात असल्याचा आरोप इम्रान समर्थक करत असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या –