Devendra Fadanvis | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज पत्रकार परिषद घेत पोलीस भरती (Police Recruitment) बाबत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी पोलीस भरतीच्या अर्जासाठी मुदत वाढवण्यात आली असल्याची देखील घोषणा केली आहे. तसेच. आता पर्यंत ११ लाख ८० हजार अर्ज भरण्यात आलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
पोलीस भरतीसाठी अर्ज भरत असताना सर्व्हर डाऊन होत असल्याने अनेकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असल्याने १५ दिवसांची मुदत वाढवण्यात आली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. तसेच, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय घेण्यात आलं असल्याचं देखील ते म्हणाले.
दरम्यान, पोलीस भरती संदर्भात ज्या काही मागण्या होत्या त्या सगळ्या आम्ही मान्य केल्या आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे. एवढंच नाही तर आज झालेल्या मंत्रीमंडाळाच्या बैठकीत ७५ हजार जागेंच्या संदर्भात आढावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ.
आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त.
अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 29, 2022
दरम्यान, इथून पुढे होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत या ७५ जागांच्या भरतीसाठी कोणत्या विभागानी काय कारवाई केली याचा आढावा द्यावा लागणार असल्याचा देखील निर्णय देण्यात आला असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.
पोलीस भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी १२वीस उत्तीर्ण असावा. तर, ड्रायव्हर कॉन्स्टेबलसाठी अनुभवासह ड्रायव्हिंग लायसन्स देखील आवश्यक आहे. या पदांसाठी कमीत कमी वय १९ वर्षे असावं आणि जास्तीत जास्त वय २८ वर्षे असावं.
या पदांसाठी अर्ज भरताना, राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी रु. 350 तर सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी रु. 450 फी भरावी लागणार आहे.
ऑनलाइन अर्ज करा –
https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx
असा भरा अर्ज –
अधिकृत वेबसाइट उघडा, त्यानंतर महा पोलीस कॉन्स्टेबल भरती 2022 नाॅटीफिकेशन/अधिसूचना शोधा. याची PDF डाउनलोड करुन माहिती नीट वाचा. पुढे “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा. आता, सर्व माहिती भरून स्वतःची नोंदणी करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. तसेच, अर्ज फी भरा. आता तुमचा अर्ज क्रमांक सेव्ह करा आणि पुढील संदर्भासाठी प्रिंट करुन ठेवा.
महत्वाच्या बातम्या :
- Krushna Hegade | “…म्हणून मी शिंदे गटात प्रवेश केला”, कृष्णा हेगडे यांचं स्पष्टीकरण
- Protein deficiency | शरीरात प्रोटीनची कमतरता असेल, तर करा ‘या’ फळांचे सेवन
- Breakfast Habit | नियमित नाष्टा केला नाही, तर होऊ शकतात ‘हे’ आजार
- Chhagan Bhujbal | “संजय राऊत यांच्यावर हल्ला होऊ शकतो”, छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
- Sanjay Raut | “बेळगावला बोलवून माझ्यावर हल्ला करण्याचा कट”; संजय राऊत यांचे गंभीर आरोप