कोकणात ओला दुष्काळ जाहीर करा, सुनील तटकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

blank

टीम महाराष्ट्र देशा – देशातून परतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनने अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोकणात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

या पत्रात तटकरे यांनी राज्यातील काही भागांत परतीचा पाऊस आणि गारपीट झाल्याने रायगडसह रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे या भागात सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी असं त्यांनी म्हटले आहे.

अतिवृष्टीमुळे उभी पिके आडवी झाली असून पिकांची नासाडी झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. शासनाने याबाबतीत पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नसून रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम बघितल्यास या दोन्ही जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करणे अत्यावश्यक आहे.

blank

या पावसामुळे झालेले नुकसान लक्षात घेता रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून कोकणातील शेतक-यांना तात्काळ मदत जाहीर करावी. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या