मोदी सरकारवरचा जनतेचा विश्वास उडाला – अण्णा हजारे

भ्रष्टाचारास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यास कमजोर केल्याने जनतेमध्ये नाराजी वाढत असल्याचं अण्णांचं मत

टीम महाराष्ट्र देशा- निवडणुकीत दिलेली आश्वासने न पाळल्याने देशातील जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला असून भ्रष्टाचारमुक्त भारताचा संकल्प करण्याचे आवाहन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यास कमजोर केल्याने जनतेमध्ये नाराजी वाढत असल्याचं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी सायंकाळी राळेगणसिद्धीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले .

शेतकऱ्यांच्या हिताच्या स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी तसेच लोकपाल व लोकआयुक्तांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी हजारे हे येत्या २३ मार्चपासून नवी दिल्लीमध्ये बेमुदत आंदोलन करणार आहेत. हजारे म्हणाले,की भ्रष्टाचाराच्या मुद्याविरोधात सन २०११ मध्ये संपूर्ण देश उभा राहिला होता. जनतेचा रेटा पाहून त्या वेळी कायदा करणे सरकारला भाग पडले होते. एकीकडे भ्रष्टाचारमुक्त भारत मुक्त करू अशी घोषणा मोदी करतात, तर दुसरीकडे भ्रष्टाचारास आळा घालणाऱ्या कायद्यास कमजोर केले जात आहे. आपल्या दौऱ्यामध्ये घेण्यात आलेल्या सभांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. नरेंद्र मोदी जनतेशी मनकी बात या कार्यक्रमातून संवाद साधतात, आता मात्र देशातील जनता मनकी बात बोलू लागली असून जनतेचा या सरकारवरील विश्वास उडाला आहे.

You might also like
Comments
Loading...