आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्नसाठी शिफारशीचे मातंग समाजाकडून स्वागत

blank

टीम महाराष्ट्र देशा : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळी यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी केली. या मागणीचे स्वागत करण्यासाठी आणि शिवसेनेचे आभार माणण्यासाठी पुणे शहरातील विवीध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आण्णाभाऊ साठे यांच्या सारसबाग येथील पुतळ्याजवळ आले होते .आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळेपर्यत शिवसेनेने पाठपुरावा करावा अशी अपेक्षा समाजाच्या वतीने करण्यात आली.

बहुजन विकास महासंघचे बाळासाहेब भांडे म्हणाले की ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मातंग समाजाचे दैवत आहे शिवाय त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे त्यामुळे त्यांना केंद्राने भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा त्याचबरोबाबर शिवसेनेने संसदेत आवाज उठवल्याबद्दल मातंग समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले .लवकरच शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना समाजच्या शिष्टळाच्यावतीने भेटून सत्कार आणि आभार मानण्यासाठी मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले .

दरम्यान, स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यानाही भारतरत्न देण्यासाठी शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर गृहमंत्रालयाने देखील भारतरत्न देण्यासाठी कोणत्याही शिफारसीची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :