अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळायलाच हवा… जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

jayant patil

मुंबई  – साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना हीच खरी आदरांजली ठरेल अशी भावनाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

अण्णाभाऊ हे जागतिक किर्तीचे प्रतिभासंपन्न साहित्यिक होते. कथाकार, पटकथाकार, शाहीरी, नाटक, लोकनाट्य, प्रवासवर्णन इत्यादी साहित्य प्रकार त्यांनी शब्दबध्द केले आहेत. एकही दिवस शाळेत न गेलेल्या अण्णाभाऊंनी विश्व साहित्यात आपला ठसा उमटवला असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेला स्तालिनग्राडचा पोवाडा रशियात प्रचंड गाजला. अण्णाभाऊ यांची तुलना रशियन कांदबरीकार दोस्काव्होस्की यांच्याशी केली जाते. ज्यांनी सातासमुद्रापार देशाची मान उंचावली त्या व्यक्तीचा सन्मान आपल्या मायभूमीत व्हायला हवा.

अण्णाभाऊ यांचे साहित्य गोरगरीब, कष्टकरी, श्रमकरी वर्गाच्या हक्क-अधिकारांची जाणीव निर्माण करणारे आहे. त्यांच्या साहित्यातील नायक-नायिका सत्वशील, स्वाभिमानी आणि अन्यायाविरुध्द लढणारे आहेत. समाजाची दुसरी बाजू दाखवणाऱ्या, त्याचे प्रश्न मांडणाऱ्या अण्णाभाऊंना भारतरत्न मिळायलाच हवा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मंत्री जयंत पाटील यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. जयंत पाटील यांनी त्यांच्या घरी भेट देऊन शिल्पशृष्टीची पाहणीही केली.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

…तोपर्यंत मी कोरोनाची लस घेणार नाही, राजीव बजाज याचं मोठ विधान

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय लांबणीवर; १० ऑगस्ट रोजी होणार सुनावणी

‘भाजपच्या नेत्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, चार महिन्यांपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा’

IMP