अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा: फाईल चोरी प्रकरणी महाव्यवस्थापक निलंबित

मुंबई: दहिसर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयातून महत्त्वपूर्ण फाईल्स चोरी झाल्याप्रकरणी शुक्रवारी राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली. याप्रकरणी महामंडळाचे व्यवस्थापक नागेश जुंबाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी याबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

सामाजिक न्याय विभागाच्या मालकीची दहिसरमधील हनुमान टेकडी भागात कल्याणी केंद्र ही 4 मजली इमारत असून त्याठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळते आहे. घोटाळ्याशी संबंधित सर्व फाईल्स आणि रेकॉर्ड याच इमारतीत ठेवण्यात आले होते. तरी, फाईल्स लंपास करणाऱ्यांमध्ये घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आमदार रमेश कदम यांचा भाऊ असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, आमदार रमेश कदम अण्णाभाऊ साठे घोटळ्याप्रकरणी सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे.

You might also like
Comments
Loading...