महाजनांच्या शिष्टाईला यश,अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित

अहमदनगर : विविध मागण्यांसाठी आजपासून सुरु होणारे अण्णा हजारे यांचे नियोजित उपोषण अखेर स्थगित करण्यात आलं आहे. आज जलसंपदामंत्री गिरीष महाजन हे सकाळी आठ वाजताच राळेगण सिध्दीमध्ये दाखल झाले होते. अखेर दोन तासांच्या चर्चेंनंतर अखेर अण्णा हजारे यांनी उपोषण स्थगित करण्याच्या निर्णय घेतला.

शेतक-यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मिळावा, लोकपाल आणि लोकायुक्ताची नियुक्ती यासह विविध प्रश्नाच्या मागण्यांसाठी हजारे उपोषण करणार होते. राळेगण सिध्दी येथील पद्मावती मंदिरात दहा वाजता उपोषणाला बसणार होते. तब्बल दोन तास हजारे व महाजन यांच्यामध्ये चर्चा सुरु होती. अण्णा हजारे यांच्याशी फोनवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चर्चा केली. या चर्चे नंतर अण्णा हजारे यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला.