fbpx

वाचा : अण्णा हजारेंनी का घेतल उपोषण मागे; कोणत्या मागण्या झाल्या मान्य

टीम महाराष्ट्र देशा – मुख्यमंत्री-अण्णांमध्ये गेली अनेक तास बंद दाराआड चर्चा झाली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे. मुख्यमंत्री-अण्णांमध्ये गेल्या सहा तासापासून चर्चा सुरूच होती. या चर्चेतून तोडगा काढत अण्णा हजारे यांनी उपोषण सोडले आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सातव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.

यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्या सर्व मागण्या मान्य करत, त्या पूर्ण करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी त्यांना दिले आहे.

या मागण्या केल्या मान्य –

– शेतमालाच्या दरासाठी समिती स्थापन करणार.

– समितीवर अण्णांनी सुचवलेली सदस्यही असतील.

– अण्णांची संयुक्त चिकित्सा समितीची मागणीही मान्य.

– लोकायुक्ताच्या नव्या कायद्यासाठी समिती स्थापन करणार.

– लोकपाल नियुक्तीचा प्रक्रिया लवकरच.

 

2 Comments

Click here to post a comment