मोदी सरकार विरोधात अण्णा हजारे गांधी जयंतीपासून करणार आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. लोकपाल आणि कृषी समस्या या विषयांवर दोन ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र अण्णा हजारे आपल्या मतावर ठाम आहेत. त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लोकपाल बाबत सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याबाबत आपण ठाम असल्याचा निर्धार अण्णा हजारेंनी केला आहे.

अण्णा हजारे पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र उपसण्याच्या तयारीत