लोकपालसाठी अण्णा हजारे यांचा पुन्हा एल्गार, तर मुख्यमंत्री म्हणतात मी मध्यस्ती करणार

अण्णा हजारे

दिल्ली : जनलोकपाल साठी रान पेटवून देशभरात भ्रष्टाचार विरोधात जन आंदोलन उभे करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जनालोकापाल साठी पुन्हा मैदानात उतरले आहेत. लोकपाल विधेयक ६ वेळा पटलावर आणलं पण पुढे काहीही झालं नाही, अशी खंत व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पुन्हा एकदा लोकपालसाठी आंदोलनाची घोषणा केलीये.

हे आंदोलन सुरु करत अण्णांनी आता थेट मोदी सरकारवर विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचबरोबर जनालोकपाल आंदोलनातूनच उदयास आलेले अरविंद केजरिवाल यांना आंदोलनापासून ४ हात दूर ठेवणार असल्याचं अण्णांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, अण्णांचं आंदोलन थांबवण्यासाठी मुख्यमंत्री मध्यस्थी करणार असून, हे आंदोलन होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी अण्णांची भेट घेणार आहेत तर नरेंद्र मोदी आणि अण्णांमध्ये संवादाचा अभाव असेल, तर तो दूर केला जाईल. असही त्यांनी स्पष्ट केलय.