ठरलं तर… या तारखेला अण्णा जनलोकपालसाठी मैदानात उतरणार !

अण्णा हजारे

अहमदनगर : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जनलोकपाल साठी मोदी सरकार विरोधात रान पेटवणार आहेत. याबाबत अण्णा हजारे यांनी यापूर्वीच इशारा दिला होता पण तारीख मात्र जाहीर केली नव्हती.

आता एन थंडीत म्हणजे फेब्रुवारीच्या २० किंवा २५ तारखेला अण्णा हजारे दिल्लीतील रामलीला मैदान, जंतर-मंतर किंवा राजघाटवर आंदोलन करणार असल्याची माहीत खुद्द अण्णांनी दिली आहे.

जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी अण्णांनी पंतप्रधान मोदींना याअगोदर अनेकदा पत्र लिहिलं आहे. मात्र मोदींकडून पत्राला काहीही प्रतिसाद न आल्याने त्यांनी अखेर आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.