आजपासून रामलीला मैदानावर अण्णांचा एल्गार !

टीम महाराष्ट्र देशा : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून एका नव्या आंदोलनासाठी सज्ज झाले आहेत. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर अण्णा आजपासून सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. आज २३ मार्च अर्थात शहीद दिनाचं औचित्य साधून अण्णा आंदोलनाची सुरुवात करणार आहेत.

या आंदोलनासाठी देशभरातील कार्यकर्ते, शेतकरी रामलीला मैदानावर जमण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लोकपालसह राईट टू रिकॉल आणि राईट टू रिजेक्ट या प्रमुख मागण्यांसाठी अण्णा हजारे हे आंदोलनास उतरले आहेत.