अण्णांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस ; अण्णा उपोषणावर ठाम

टीम महाराष्ट्र देशा : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या हालचालींना वेग आलाय. अण्णांच्या 11 पैकी 10 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. सरकारने याबद्दलचा मसुदा दाखवलाय मात्र अण्णांना ठोस आश्वासनाशिवाय माघार घेण्यास नकार दिलाय.

अण्णांच्या मागण्यांनंतर सरकारतर्फे तयार करण्यात आलेला आश्वासनांचा मसुदा पंतप्रधान कार्यालयात पाठवण्यात आलाय. हा मुसदा पंतप्रधान कार्यालयाकडून तयार कऱण्यात आला तो अण्णांना दाखवण्यात आलाय. मात्र तो अण्णांना मान्य नाही. गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अण्णांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून निकाल स्पष्ट होईल अशा विश्वास व्यक्त केलाय.

दरम्यान, अण्णा हजारेंशी चर्चा करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामलीला मैदानावर जाणार आहेत. मात्र अण्णांनी उपोषण सोडण्याचं मान्य केल्यानंतरच देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना होतील. आज सहा दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या अण्णा हजारेंचं वजन 5 किलोनं घटल्याचं समजतंय.

You might also like
Comments
Loading...