सभेला गर्दी कमी असली तरी चालेल, मात्र ती दर्दी असली पाहिजे – अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा: कधीकाळी लाखोंच्या संख्येने सभेला जनसमुदाय जमवणाऱ्या आण्णा हजारे यांच्या इंदापुरातील सभेला मात्रा अवघे शे-दोनशे लोकांचीच हजेरी होती. याची खंत स्वतः अण्णा हजारे यांनी देखील बोलून दाखवली ते म्हणाले , “सभेला गर्दी कमी असली तरी चालेल, मात्र ती दर्दी असली पाहिजे.”

bagdure

इंदापुरात अण्णांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. त्यावेळी त्यांनी अरविंद केजरीवालांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, लोकपाल अशा विविध विषयांवर मतं मांडली. पुन्हा ‘अरविंद’ उभा राहणार नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेत आहोत की, मी कोणत्याही पार्टीत जाणार नाही, मी माझ्या चारित्र्याला जपेन, माझे आचार-विचार शुद्ध ठेवेन, मी देशाची सेवा करेन आणि कोणत्याही पक्षात जाऊन निवडणूक लढवणार नाही. अशा प्रकारचे स्टॅम्पवर लिहून घेतो आहे.”, असे अण्णा हजारेंनी सांगितले.

तसेच, अशा प्रकारे आजपर्यंत 4 हजार जणांचे अर्ज आले आहेत, अशी पद्धत राबविल्यामुळे आता पुन्हा ‘अरविंद केजरीवाल’ उभा राहणार नाही, असेही ते म्हणाले.

You might also like
Comments
Loading...