उपोषणामुळे मी मरणार नाही आणि मला मरू देण्याची हिंम्मत सरकारमध्ये नाही – अण्णा हजारे

नागरिकांच्या हक्कासाठी उपोषण केल्याने मी मरणार नाही, तसेच मला मरू देण्याची हिंम्मत सरकारमध्ये नसल्याचा विश्वास जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला आहे. राळेगणसिद्धीमध्ये आयोजित ग्रामसभेत ते बोलत होते. लोकपाल, शेतक-यांचे प्रश्न व निवडणूक सुधारणांच्या प्रश्नांवर २३ मार्चपासून अण्णा हजारे दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, राळेगणमध्ये आयोजित ग्रामसभेत अण्णांनी वाढत्या वयाचा तसेच प्रकृतीचा विचार करता उपोषण न करता वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

पुढे बोलताना अण्णा हजारे शेती आणि शेतकऱ्यांबद्दल चिंता व्यक्त करताना म्हणाले कि ‘देशभरात शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने मागील पंधरा-वीस वर्षांत देशात लाखो शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत. महाराष्ट्रातही सर्वच भागात शेतक-यांच्या आत्महत्यांचा गंभीर प्रश्न आहे. राज्यात कृषिमूल्य आयोग असून त्याचा अहवाल केंद्राला जातो. राज्य व केंद्राच्या कृषिमूल्य आयोगाला स्वतंत्र करून स्वायत्तता द्या. त्यावर तज्ज्ञ शेतक-यांची नेमणूक केली पाहिजे. शेतक-यांना ६० वर्षांनंतर निवृत्ती वेतन मिळायला हवे. लोकपाल कायद्याची अमंलबजावणी करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्लक्ष केले असून हा कायदा कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही अण्णांनी केला.

You might also like
Comments
Loading...