देशाने आज एक महापुरुष गमावला – अण्णा हजारे

Anna Hazare

पुणे : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, मागील 48 तासांत त्यांची प्रकृती जास्त खालावली होती.

अटलजी यांच्या जाण्याने देशाचं मोठं नुकसान झालं आहे. वाढत्या लोकसंख्येत दिवसेंदिवस अटलजींसारख्या निस्वार्थी पद्धतीने काम करणारे चांगले लोक कमी होत आहेत. त्यांचं जीवन देशासाठी एका दीपस्तंभासारख होत. एक आदर्श संसदपटू कसा असावा याच उदाहरण त्यांनी त्यांनी दाखवून दिलं. आम्ही अनेकवेळा भेटलो पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी मला कार्यक्रमात बोलावलं होतं आणि खूप प्रेमाने विचारपूस केली होती. आज देशाने एक महापुरुष गमावला आहे. आशा शब्दांत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना अदारांजली अर्पण केली आहे.

देशाच्या राजकारण एक मितभाषी आणि कणखर नेतृत्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांना ओळखलं जातं. कारगिलची लढाई असो की भारताला अणुअस्त्रधारी देश बनवण्याच्या निर्णय, त्यांनी आंतरराष्ट्रीय विरोध झुगारत देशहिताचे असंख्य निर्णय घेतले होते.

नैतिक मुल्यांवर अढळ श्रध्दा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला !