अण्णा हजारे पुन्हा उपोषण करण्याच्या तयारीत

anna hajare vr pm

राळेगण सिद्धी : सरकार लोकपाल, लोकायुक्ताच्या नियुक्ती करीत नसल्याच्या निषेधार्थ महात्मा गांधी पुण्यतिथी (दि. ३० जानेवारी २०१९) पासून राळेगण सिद्धी येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

उपोषणाची घोषणा करताना हजारे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. देशातील भ्रष्टाचाराला रोखण्याचा प्रश्न असल्यामुळे आश्वासनानुसार लोकपाल , लोकायुक्त नियुक्ती झाली नाही तर आपण महात्मा गांधी पुण्यतिथीपासून पुन्हा उपोषण आंदोलन करू, असा इशारा हजारे यांनी दिला आहे.लोकपाल नियुक्त करण्याची केंद्र सरकारची इच्छा दिसत नाही. हा जनतेचा विश्सासघात आहे. हृदयविकाराने मृत्यु येण्यापेक्षा देश आणि समाजासाठी मृत्यु आला तर ते माझे भाग्य समजेन असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

सरकारच्या अधोगतीची वेळ आली आहे- अण्णा हजारे

लोकपाल विधेयक आणि लोकायुक्तांच्या नियुक्तीबाबत बैठकीवर काँग्रेसचा बहिष्कार

लोकपाल कायदा असता तर राफेलचं सत्य जनतेपुढे आलं असतं : हजारे