fbpx

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अण्णा हजारे यांनी सोडले उपोषण

टीम महाराष्ट्र देशा – मुख्यमंत्री-अण्णांमध्ये गेली अनेक तास बंद दाराआड चर्चा झाली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे. मुख्यमंत्री-अण्णांमध्ये गेल्या ६ तासापासून चर्चा सुरूच होती. या चर्चेतून तोडगा काढत अण्णा हजारे यांनी उपोषण सोडले आहे.

दुपारी राळेगणसिद्धीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग हे दोन नेते अण्णा हजारेंना भेटण्यासाठी दाखल झाले होते. त्यांच्यामध्ये सहा तासापासून बंद दाराआड चर्चा सुरू होती. या बैठकीनंतर अण्णा हजारे यांनी उपोषण सोडले आहे.

केंद्राने लोकपाल कायदा केला. परंतु चार वर्षं झाली तरी लोकपालची नेमणूक केली नाही. स्वामीनाथन आयोगाचा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही, यासह आणखी काही मागण्यासाठी अण्णा हजारे उपोषणाला बसले होते.

केंद्राने लोकपाल कायदा केला. परंतु चार वर्षं झाली तरी लोकपालची नेमणूक केली नाही. स्वामीनाथन आयोगाचा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही. शेतकऱ्यांच्या मालाला दीड पट भाव दिल्याचं सरकार सांगत असलं तरी प्रत्यक्षात दिला असता तर शेतकऱ्यांनी कांदा, टोमॅटो रस्त्यावर फेकले नसते. आम्ही शेतकरी आणि शेतमजुरांना मासिक पाच हजार रुपये निवृत्ती वेतनाची मागणी केली होती. सरकारने मात्र वार्षिक सहा हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असं अण्णा हजारे यांचे म्हणण होते.