‘तब्येतीची काळजी घ्या, जास्त दिवस उपोषण करू नका’;ग्रामस्थांची अण्णांना विनंती

ralegan aana hajare

अहमदनगर : शेतक-यांचे प्रश्न आणि लोकपालबाबत आंदोलनासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आज सकाळी राळेगण सिध्दी ग्रामस्थांनी भावनाविवश होत अण्णांना निरोप दिला.आज सकाळी हजारे यांनी ग्रामदैवत यादवबाबा मंदिर, निळोबाराय, पद्मावती मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर कारने ते पुण्याकडे रवाना झाले. पुण्यावरुन ते विमानाने दिल्लीला जाणार आहेत. यावेळी अण्णांना निरोप देण्यासाठी शाळेतील विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. ‘तब्येतीची काळजी घ्या, जास्त दिवस उपोषण करू नका’ अशी विनंती ग्रामस्थांनी अण्णांना केली.
सकाळी सव्वा दहा वाजता अण्णा दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी राळेगणकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अण्णांना निरोप देण्यासाठी परिसरातील महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.दिल्लीला रवाना होण्यापूर्वी अण्णांनी यादवबाबांचं दर्शन घेतलं आणि श्रद्धास्थानांसमोर नतमस्तक झाले. यावेळी गावातील महिलांनी अण्णांचं औक्षण केले.राळेगणमधील नागरिकांनी तिरंगा घेत, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ आणि ‘अण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ असा जयघोष केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
झोपड्यांना हात लावाल तर याद राखा - केंद्रियमंत्री रामदास आठवले यांचा सरकारला इशारा
भाजप नेत्यानेच उपस्थित केला सवाल, उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय?