अण्णा हजारे यांचं आजपासून उपोषण

1 anna-hazare

टीम महाराष्ट्र देशा : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं आजपासून उपोषण सुरु करत आहेत. लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी अण्णा त्यांच्या राळेगणसिद्धी या गावात आंदोलन करत आहेत. अण्णा हजारे यांनी यादवबाबचे दर्शन घेऊन उपोषणाला सुरुवात केली. यादवबाबा मंदिराबाहेर उभारलेल्या स्टेजवरुन अण्णा आज पुन्हा जय हिंद, इन्कलाब जिंदाबादची हुंकार भरणार आहेत. आंदोलनात सहभागी होण्यासाठी अण्णा समर्थक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. तसंच आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनीही एकजूट केली.

दरम्यान लोकायुक्ताच्या कक्षेत मुख्यमंत्री हे पदही असावं यासाठी राज्य सरकार लोकायुक्ताच्या कायद्यात संशोधन करणार आहे. तरीही आपण उपोषणावर ठाम असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कालच स्पष्ट केलं. तसेच लोकपाल आणि लोकयुक्तवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अण्णा हजारे यांनी सडकून टीका केली. मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे चालल्याचा आरोप अण्णांनी केला.