fbpx

मोठी बातमी : अण्णा हजारेंचं आजपासून मौनव्रत आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही केंद्राकडून लेखी आश्वासन न आल्याने अण्णा हजारेंनी आजपासून मौनव्रत आंदोलन सुरु केले आहे.

केंद्राने लोकपाल कायदा केला. परंतु चार वर्षं झाली तरी लोकपालची नेमणूक केली नाही. स्वामीनाथन आयोगाचा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही, यासह आणखी काही मागण्यासाठी अण्णा हजारे उपोषणाला बसले होते. मात्र, मुख्यमंत्री-अण्णांमध्ये अनेक तास बंद दाराआड चर्चा झाली यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे. मुख्यमंत्री-अण्णांमध्ये ६ तास चर्चा सुरूच होती. या चर्चेतून तोडगा काढत अण्णा हजारे यांनी उपोषण सोडले. परंतु तरीदेखील आत्तापर्यंत केंद्राकडून कोणतेही लेखी आश्वासन न आल्याने अण्णांनी हे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

केंद्राने लोकपाल कायदा केला. परंतु चार वर्षं झाली तरी लोकपालची नेमणूक केली नाही. स्वामीनाथन आयोगाचा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही. शेतकऱ्यांच्या मालाला दीड पट भाव दिल्याचं सरकार सांगत असलं तरी प्रत्यक्षात दिला असता तर शेतकऱ्यांनी कांदा, टोमॅटो रस्त्यावर फेकले नसते. आम्ही शेतकरी आणि शेतमजुरांना मासिक पाच हजार रुपये निवृत्ती वेतनाची मागणी केली होती. सरकारने मात्र वार्षिक सहा हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असं अण्णा हजारे यांचे म्हणण आहे.

2 Comments

Click here to post a comment