संघाशी संबंध जोडून बदनामी करणाऱ्यांविरोधात विरोधात न्यायालयात जाणार – हजारे

टीम महाराष्ट्र देशा- आंदोलनामुळे राजकीय पक्षांची ‘धरावे तर चावते आणि सोडावे तर पळते ‘ अशी अवस्था झाली आहे.बरेच लोक मला बदनाम ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मला बदनामीची फीकीर नाही. अशा प्रकारे बदनामी करणाऱ्या लोकांविरूद्ध लवकरच उच्च न्यायालयामध्ये बदनामीचा खटला दाखल करण्याचा आम्ही निर्णय घेतला असे अण्णा हजारे यांनी काल स्पष्ट केले. हजारे यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रक काढले आहे.

आंदोलन बदनाम करण्याच्या हेतूने केलेल्या कटकारस्थानामुळे इनामदार यांना गोडसेंशी जोडले गेले- हजारे
“मला व माझ्या आंदोलनास बदनाम करण्यासाठी आंदोलनामधील एक कार्यकर्त्या कल्पना इनामदार या नथुराम गोडसे यांची नात असल्याच्या आणि त्यांच्या हाती या आंदोलनाची सर्व सूत्रे हजारे यांनी सोपविल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांत पसरविल्या जात आहेत. वास्तविक इनामदार यांचा व माझा पूर्वी कधीच परिचय नव्हता. आंदोलनापूर्वी विविध राज्यांतील नवीन जे कार्यकर्ते पुढे आले त्यातील इनामदार एक होत्या. त्यांच्याकडे आंदोलनाचे कोणतेही सूत्र सोपविले नव्हते. समन्वय समितीमधील कार्यकर्त्यांना आंदोलनाची जी कामे विभागून दिली त्यानुसार इनामदार यांना मंडप व मंच व्यवस्थेची जबाबदारी दिली होती एवढेच.”

या आंदोलनाची सर्व सूत्रे मी स्वत: हाताळीत होतो. मात्र, आंदोलन बदनाम करण्याच्या हेतूने केलेल्या कटकारस्थानामुळे इनामदार यांना गोडसेंशी जोडले गेले. तसेच त्यांना आंदोलनाचे मुख्य सूत्रधार करून माझा संघाशी संबंध जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे, हे पूर्णतः खोटे आहे. सोशल मीडियावर काही मंडळी मुद्दामहून त्यावर चर्चा करून माझी व आंदोलनाची बदनामी करीत आहेत,” असे हजारे यांनी म्हटले आहे.