नाहीतर तुरुंगात आंदोलन करावे लागेल; अण्णा हजारेंचा अंतिम इशारा

अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा : लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी वारंवार विनंती करूनही जागा उपलब्ध न करून दिल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदींना शेवटचा इशारा दिला आहे. मला आंदोलनासाठी दिल्लीत जागा न उपलब्ध करून दिल्यास नाईलाजाने तुरुंगात आंदोलन करावे लागेल, असे अण्णांनी म्हटले आहे.

आंदोलनाच्या जागेसाठी ७ नोव्हेंबर २०१७ पासून हजारे यांनी आतापर्यंत बारा वेळा पत्रे मोदींना पाठवली आहेत. मात्र, यापैकी एकाही पत्राला उत्तर देण्याचे सौजन्य पंतप्रधान मोदींनी दाखविलेले नाही. त्यामुळे अण्णांनी पंतप्रधान मोदींना अखेरचे पत्र पाठवून अंतिम इशारा दिला आहे. अण्णा हजारे येत्या 23 मार्चपासून आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.