रणसंग्राम विधानसभेचा : आण्णा हजारेंनी बजावला मतदानाचा हक्‍क

टीम महाराष्ट्र देशा :- आज २८८ जागांसाठी राज्यभरात मतदान होत आहे. सेलेब्रिटी, राजकीय नेत्यांसह, वृद्ध मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडत आहे.ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनीही राळेगणसिद्धी (पारनेर) येथे मतदानाचा हक्‍क बजावला.

तर तिकडे आदर्श गाव योजनेचे प्रवर्तक पोपटराव पवार यांनी हिवरेबाजारमध्ये मतदानाचे कर्तव्य पार पाडले.तसेच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शहरात आपल्या मतदानाचा हक्‍क बजावला.

यावेळी द्विवेदी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच आज सकाळी पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह विविध मान्यवरांनी आपआपल्या मतदारसंघात मतदान केले.

दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

महत्वाच्या बातम्या