मार्च मधील आंदोलनात नवा केजरीवाल पैदा होऊ देणार नाही-अण्णा

टीम महाराष्ट्र देशा– जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 23 मार्च पासून पुन्हा एकदा भ्रष्टाचारा विरोधात आंदोलन छेडणार असून ,या आंदोलनातून नवीन केजरीवाल पैदा होऊ देणार नाही असं म्हणत दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट अण्णांनी निशाणा साधला आहे.
2011 साली अण्णांनी अशाच प्रकारे भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि लोकपालसाठी आंदोलन छेडलं होतं. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी नावाचा पक्ष काढून दिल्लीची सत्ता काबीज केली. दिल्लीची सत्ता काबीज केल्यानंतर केजरीवाल आणि अण्णा हजारे यांच्यात दरी वाढत गेली. आपल्या आंदोलनाचा राजकीय फायदा केजरीवाल यांनी घेतल्याची खंत हजारे यांच्या मनात आहे.

नाराज अण्णांनी यापूर्वी देखील केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.आता पुन्हा एकदा अण्णा भ्रष्टाचार ,शेतकऱ्यांच्या समस्या,आणि लोकपालच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात 23 मार्च 2018 पासून आंदोलन करण्याचा तयारीत आहेत.मात्र या आंदोलनातून नवा केजरीवाल पैदा होऊ देणार नाही असं अण्णांनी म्हटलंय.शेतकऱ्यांच्या समस्या ,लोकपाल ची नियुक्ती,आदी मुद्दे आंदोलनाच्या केंद्रस्थानी असतील असं देखील हजारे यांनी स्पष्ट केलं आहे.याचबरोबर जे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील त्यांच्याकडून स्टॅम्प पेपर वर लिहून घेतलं जाणार आहे की ,नवीन पक्ष काढणार नाही तसेच कोणत्या पक्षाला पाठिंबाही देणार नाही आणि निवडणूक देखील लढणार नाहीत

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली