अण्णा हजारे पुन्हा एकदा जनआंदोलन पुकारणार; ठाकरे सरकारला दिला इशारा

uddhav vs anna

अहमदनगर – ज्येष्ठ समाजसेवक आणि भ्रष्ट्राचार निर्मूलन जनआंदोलन न्यासचे प्रमुख अण्णा हजारे हे पुन्हा एकदा लोकायुक्त कायद्यावरुन आक्रमक झाले आहेत. लोकपाल व लोकायुक्त कायदा अत्यंत प्रभावी आहे. मुख्यमंत्री, आमदार, अधिकारी यांच्याविरोधात सक्षम पुरावे लोकायुक्तांकडे दिले तर त्यांची चौकशी करून कारवाई होऊ शकते, असा हा कायदा आहे. परंतु राज्य सरकार चालढकल करत असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.

केंद्रात लोकपाल कायदा मंजूर करण्यात आला आहे. पण, राज्यात अद्यापही लोकायुक्त कायदा मंजूर नाही. राज्य सरकारशी याबाबत मी सातत्याने संपर्क साधत असून काही दिवसांपूर्वीच मुख्य सचिवांशीही फोनवर बोललो होतो, पण अद्यापही प्रतिसाद नाही. त्यामुळे, वेळ पडल्यास पुन्हा एकदा जनआंदोलन पुकारणार असल्याचा इशारा अण्णा हजारे यांनी पत्रकाद्वारे राज्य सरकारला दिला आहे.

आम्ही 2011 पासून आंदोलन करत आलोय. भाजपच्या काळात सुद्धा आंदोलन करण्यात आले आहे. या सरकारला लोकपाल व लोकायुक्त कायदा आणण्यासाठी मागणी केली होती. त्यामुळे या सरकारला तीन महिन्याचा कालावधी देत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात वयाच्या 85 व्या वर्षी सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी राज्य सरकार विरोधात उपोषण करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिलाय.

हे सरकार फक्त पडण्यासाठी घाबरत, त्यामुळे हे सरकार मोर्चे आंदोलनाला घाबरत नाही. मात्र जनतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी लोकायुक्त कायदा लागू करावा, या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचे अण्णा यांनी स्पष्ट केलं.प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांना आंदोलनाच्या तयारी लागा, अशा सूचना देण्यात येत आहेत. आता सप्टेंबर आहे, आम्ही एक नोटीस देणार देऊ, त्यानंतर एकाच वेळी राज्यभरात अहिंसेच्या मार्गाने मोठं आंदोलन करणार असल्याचं अण्णांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या