मलाईदार खात्यांच्या हव्यासापोटी खातेवाटपाला उशीर ? अण्णा हजारेंनी उपस्थित केला सवाल

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन १२ दिवस झाले तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. तर शपथ दिलेल्या कॅबिनेट मंत्र्यांनाही अजून खाते वाटप केले नाही. त्यामुळे या ठाकरे सरकारचे चालले तरी काय असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले की, राज्यातील कारभार हा ढिला पडला आहे. सरकार स्थापन होऊनही खाते वाटप झाले नाही. नेमका उशीर कुठे होतोय. हे सामान्य माणसाला कळाले पाहिजे. सरकारने सामान्य नागरिकांना याबाबत माहिती दिली पाहिजे. मलाईदार खात्यांच्या वाटपात मतभेद होत असल्याने उशीर तर होत नाहीना ? असा सवाल अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

दरम्यान राज्यातील अनेक दिवसांच्या सत्ता संघर्षानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र अजूनही खाते वाटप होत नसल्याने नेमकं या सरकारचं चाललयं तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेकडून मंत्र्यांची यादी तयार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खातेवाटपावरून मतभेद असल्याचं सांगितलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या