पाच महिन्यांत भाजपच्या खजिन्यात तब्बल ८० हजार कोटी – अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा: मागील पाच महिन्यात सत्ताधारी भाजपच्या खजिन्यामध्ये तब्बल ८० हजार कोटी जमा झाले असल्याचा गौप्यस्फोट जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले आहे. अण्णा हजारे हे २३ मार्चपासून जनलोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीत आंदोलन करणार आहेत. तत्पूर्वी त्यांचा देशव्यापी दौरा सुरू आहे.

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून भारत हा आशिया खंडातील भ्रष्ट देशाच्या यादीत अग्रस्थानी जाऊन बसला आहे. हि माहिती माझी स्वत:ची नसून ‘फोर्ब्ज’ मॅगेझिनने आशिया खंडातील देशांच्या केलेल्या सर्वेक्षणानंतर प्रसिद्ध केली असल्याचा सांगत त्यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच केंद्र सरकारला शेतकऱ्यांची नाही तर उद्योगपतींच्या हिताची काळजी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.