जनलोकपालसाठी शहीद दिनापासून अण्णा हजारे पुन्हा मैदानात !

अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा: जनलोकपाल संपूर्ण देशात जनआंदोलन उभारणे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शहीद दिनापासून अर्थात 23 मार्च 2018 पासून जनलोकपाल कायद्यासाठी आंदोलन सुरु करणार आहेत. अण्णांनी या संदर्भात देशभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला असून, त्यानुसार फेब्रुवारी ऐवजी मार्चला प्राधान्य देण्यात आलं आहे.

रामलीला मैदान, जंतर-मंतर किंवा शहीद पार्कवर हे आंदोलन करणार असून जागेसंदर्भात सरकार बरोबर पत्र व्यवहार सुरु आहे. असं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं आहे. तर 23 मार्चला शहीद दिन असतो. त्यामुळे या तारखेची आंदोलनासाठी निवड केल्याचे अण्णा हजारेंनी सांगितले.

या आंदोलनासाठी अण्णा देशभरात जनजागृती करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पत्रव्यवहार करून सुद्धा काहीही उत्तर न आल्याने मी हे आंदोलनाच हत्यार उपसलं आहे असं अण्णा हजारे यांनी सांगितलं