अण्णा हजारे पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र उपसण्याच्या तयारीत

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र उपसण्याच्या तयारीत आहेत. हजारे यांच्या मागण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकार कायम सकारात्मक भूमिका घेत असून त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. मात्र, अण्णा हजारे २ आॅक्टोबरपासून उपोषणावर ठाम आहेत.

केंद्रात लोकपाल आणि राज्यस्तरावर लोकायुक्त यांची नियुक्ती करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले. महाजन यांनी शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णांशी चर्चा केली. राज्य आणि केंद्र सरकारने अण्णांनी नमूद केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांना सांगितले.

अण्णा हजारे उपोषण सोडणार ? पंतप्रधान कार्यालयानं दिलेला ड्राफ्ट केला मान्य