fbpx

अण्णा आंदोलन : आज गावात चुलबंद, तर सरकारी कर्मचाऱ्यांना गाव बंदी

aana hajare hunger strike update

टीम महाराष्ट्र देशा – जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. अजूनही सरकारने अण्णांच्या आंदोलनाकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे राळेगणसिद्धी येथील गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत कोणताही सरकारी कर्मचारी आणि अधिकारी गावात फिरु न देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, आज गावात चूल बंद आंदोलन असून प्रत्येकाने बैलगाड्या आणि दुचाकी घेऊन गावातील रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, केंद्रात लोकपाल नियुक्त करावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सुरु केले असून, आज या उपोषणाचा सातवा दिवस आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका अण्णांनी घेतली आहे. शिवाय, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येत्या 8 किंवा 9 फेब्रुवारीला ‘पद्मभूषण’ पुरस्कार परत करेन, असा इशाराही अण्णांनी दिला आहे.