‘…म्हणून गेल्या पाच वर्षांत मी सरकारच्या विरोधात आंदोलने केली नाहीत’

टीम महाराष्ट्र देशा : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आपल्या अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करून सरकारला नमते घ्यायला लावण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी अशाच प्रकारची आंदोलने करून आतापर्यंत बरेच प्रश्न मार्गी लावले आहेत. परंतु गेल्या पाच वर्षांत अण्णा हजारे यांनी सरकारविरुद्ध आंदोलने केली नाहीत. त्याविषयी अण्णांनी भाष्य केले आहे.

अण्णा हजारे यांनी भाजप सरकारविषयी बोलताना नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही निष्कलंक, भ्रष्टाचार मुक्त आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधातील घोटाळ्यांची प्रकरणं गेल्या पाच वर्षांत माझ्याकडे आलीच नाहीत. मुख्यमंत्री मी जेव्हा फोन करेल तेव्हा प्रतिसाद देतात. ते माझं ऐकतात. म्हणून गेल्या पाच वर्षांत मी सरकारचा भ्रष्टाचाराविरोधात आंदोलने केली नाहीत असं विधान केले आहे.

Loading...

पुढे बोलताना त्यांनी ‘केंद्र सरकारने लोकपाल कायदा आणला. राज्य सरकारने लोकायुक्त आणण्याची कारवाई सुरू केली. विद्यमान सरकार चांगलं काम करतेय मी चांगल्याला चांगलंच म्हणणार. माझ्याकडं केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात कसलेच पुरावे येत नाहीत, त्यामुळं मी कोणाच्या विरोधात आंदोलन करू आणि का करू असंही विधान अण्णा हजारे यांनी केले आहे.

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर पक्षांतारावरून निशाणा साधला आहे. त्यांनी राष्ट्रवादीतून अनेक लोक सोडून जात आहेत. याचं कारण म्हणजे शरद पवारांचं काम आहे. साखर कारखाने, बँका लुटून खाल्ल्याचा हा परिणाम असून ‘जैसी करनी वैसी भरनी’ आहे असं हजारे म्हणाले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
त्या ५० तबलिगींनी लवकरात लवकर पुढे यावे, अन्यथा....
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला 'इशारा'; मदत केली तर ठीक, अन्यथा…
निलेश राणेंचा राज्यसरकारवर घणाघात, म्हणाले....
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
पुण्याच्या 'या' परिसरात आहेत सर्वाधिक रुग्ण
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका