बहुजनांना जागे करणारे अण्णा भाऊ साठे मराठी साहित्यातील कोहिनुर होते – रामदास आठवले

बहुजनांना जागे करणारे अण्णा भाऊ साठे मराठी साहित्यातील कोहिनुर होते – रामदास आठवले

annabhau sathe ramdas aathwalwe

मुंबई : शोषित दलित पीडित वर्गाच्या वेदना शब्दबद्ध करणारे बहुजनांचे प्रबोधन करुन त्यांना सामाजिक विषमता आणि भांडवलशाही विरुद्ध लढण्यास समतेचा मार्ग दाखविणारे क्रांतिकारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्यातील कोहिनुर होते असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 52 व्या स्मृतिदिनी रामदास आठवले यांनी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे हे केवळ दीड दिवस शाळेत गेले. मात्र त्यांनी लिहिलेले साहित्य जगभरातील उच्च शिक्षितांना मानवी हक्काचे धडे शिकवीत आहे. अण्णा भाऊंनी लिहिलेली फकिरा कादंबरी, वारणेचा वाघ, अलगुज अशी अनेक कादंबरी पुस्तके प्रचंड गाजली. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भरीव योगदान दिले. दलित पददलितांचे जीवनमान लेखणीतून चित्रित केले.

जग बदल घालुनी घाव सांगून गेले आम्हा भीमराव असे आपल्या काव्यातून समस्त मातंगसह दलित जातींना संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समतेच्या मार्गाने चालण्याचे अण्णाभाऊंनी समाजाला संगीतले आहे. बौद्ध मातंग सह दलितांमधील सर्व जातींनी एकत्र येण्याचा संकल्प अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करताना आपण केला पाहिजे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

महत्वाच्या बातम्या