लेटर बॉम्ब इफेक्ट : राष्ट्रवादी पक्षात कुठलीही खदखद नाही, काकडेंची सारवासारव

sharad-pawar

टीम महाराष्ट्र देशा : ‘राष्ट्रवादीमध्ये आमदार, खासदार, प्रवक्ता, शहर अध्यक्ष, वेगवेगळ्या सेलची प्रमुख पद ही फक्त मराठा समाजाला दिली जात आहेत,’ असा घणाघाती आरोप करत एक निनावी पत्र व्हायरल झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता असून मी मांडत असलेली भावना पक्षातील असंख्य लोकांच्या मनात आहे, असा दावा पत्र लिहिणाऱ्याने केला आहे.

‘वंदना चव्हाण यांच्या कामामुळे एनजीओ बळकट झाल्या आहेत आणि पक्षसंघटना खिळखिळी झाली आहे. चेतन तुपे यांच्या पार्ट टाईम काम करण्याच्या पद्धतीमुळे पक्षाच्या स्थापनेपासूनच ही सर्वात अयशस्वी कारकीर्द ठरणार आहे. नेत्यांना फसवून तुम्ही यशस्वी व्हाल पण पक्षाचे वाटोळे होणार आहे,’ असं म्हणत या पत्राद्वारे राष्ट्रवादीच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी पक्षात कुठलीही खदखद नाही. निनावी पत्र हे विरोधकांचे षडयंत्र असून सांगली, कोल्हापूर येथील पूरस्थितीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपच्या आयटी सेलकडून असे फेक पत्र व्हायरल केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या