मी एका पक्षात आहे , त्याचे काही प्रोटोकॉल आहेत त्यामुळे मी पोस्टर वादावर काही बोलू शकत नाही

भाजपच्या पोस्टरवरुन गोपीनाथ मुंडेंचा फोटो गायब प्रकरणी पंकजा मुंडे यांनी सोडलं मौन

टीम महाराष्ट्र देशा : भाजपच्या ३८ व्या स्थापना दिवशी मुंबईत झालेल्या महामेळाव्यात स्टेजवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नसल्याने मुंडे समर्थकांनी आक्रमत होत मेळाव्यात घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता. या सगळ्या वादावर आता पंकजा मुंडे यांनी आपल मौन सोडलं आहे.

“ते कार्यकर्ते फक्त बीडचे नव्हते. त्यांचे चेहरे माझ्या ओळखीचे नव्हते. त्यांच्या हातात मुंडे साहेबांचे पोस्टर होते आणि ते काय म्हणत होते, हे मला स्टेजवरुन नीट ऐकूदेखील येत नव्हतं. पण मंचावरील सर्व नेत्यांनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. त्यामुळे काही वाद नाही.”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

तर, “मला स्वतःला दुख झालं की नाही, यापेक्षा मी एका पक्षात आहे, त्याचे काही प्रोटोकॉल आहेत, जे पाळावे लागतात. त्यामुळे मी पोस्टर वादवार काही बोलू शकत नाही.”, असेही त्या पुढे म्हणाल्या.