राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला?

टीम महाराष्ट्र देशा- कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज (गुरुवार) ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे हे देखील सोबत आहेत.

दरम्यान, चौकशीला हजर राहताना राज यांनी सहकुटुंब हजेरी लावल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खिल्ली उडवली आहे. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? का सहनुभी गोळा करण्याचा हा प्रयत्न असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोहिनूर सीटीएनएलमध्ये आयएल अॅण्ड एफएस ग्रुपच्या कर्ज आणि 860 कोटींच्या गुंतवणुकीचा ईडी तपास करत आहे. याच प्रकरणी राज ठाकरेंची चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेरही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोहिनूरप्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची पुत्र उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकरांची दोन दिवसांपासून चौकशी केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या