मुंबई: केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्याने मारहाण केल्यामुळे राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही पक्षातील महिलेवर हात उगारला, तर स्वतः तिथे जाऊन हात तोडून हातात देईन’, असा इशारा दिला होता. यावरूनच आता अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना टोला लगावला आहे.
“जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश करताना खडसे म्हणाले की मला बाई ‘दिली’ नाही ‘मागे’ लावली, तेव्हा मी सुप्रिया ताईंना व्हाॅट्स अप केले. मला वाटलं एक स्त्री म्हणुन या वक्तव्याचा त्या निषेध करतील. एक शब्द काढला नाही, किंवा उत्तरही दिले नाही. तेव्हा का बोलल्या नाहीत आपण?”, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीला मारलेलं तुम्ही पाहिलं? ही महाराष्ट्राची मराठी संस्कृती आहे का? हा शाहू, फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांनी नेहमी महिलांचा मान-सन्मान केलेला आहे. आता मी तुम्हाला सांगते की, आजच्यानंतर जर महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही महिलेवर अंगावर हात उगारण्याचा प्रयत्न केला. तर मी स्वत: तिथे जाईन आणि त्याच्याविरोधात कोर्टात केस करेन आणि त्याचे हात तोडून हातात देईन, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला होता.
महत्वाच्या बातम्या:
- निर्ढावलेलं सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय – सदाभाऊ खोत
- आदित्य ठाकरेंनी 3,520 कोटी घातले पाण्यात; आप’चा गंभीर आरोप
- “…तर ‘त्या’ घटनांच्या वेळी सुप्रिया सुळे का बोलल्या नाहीत?”; फडणवीसांचा सवाल
- निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ प्रस्तावास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी
- “सुप्रिया सुळेंवर कारवाई करणार ना?”, अतुल भातखळकरांचा महाविकास आघाडीला सवाल