fbpx

राज ठाकरे यांच्या चौकशीची वेळ चुकीची- दमानिया

anjali damaniya

टीम महाराष्ट्र देशा:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ते आज ईडीच्या चौकशीला समोर जात आहेत. त्याचनिमित्त सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी राज ठाकरे यांच्या चौकशीसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहे या चौकशीची वेळ चुकीची असल्याचे मत दमानिया यांनी व्यक्त केले आहे. मात्र त्याचवेळी ही चौकशी याआधीच व्हायला हवी होती असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. तसचं राज ठाकरे यांच्या कमाईचे साधन काय?, त्यांच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? असा सवालही त्यांनी एका वृत्तवाहिनिशी बोलताना व्यक्त केला आहे.

दरम्यान, चौकशीला हजर राहताना राज यांनी सहकुटुंब हजेरी लावल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खिल्ली उडवली आहे. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? का सहनुभी गोळा करण्याचा हा प्रयत्न असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे.

राज यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे असं वाटतं का या प्रश्नालाही दमानिया यांनी उत्तर दिले. राज ठाकरे हे सरकारविरुद्ध बोलत असल्याने त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचं बोललं जात आहे. तरी राज ठाकरेंकडे एवढी अमाप संपत्ती कुठून आली, प्रश्न विचारले तर काय चुकलं? खरं तर ही चौकशी खूप वर्षांपूर्वीच व्हायला हवी होती ती आज झाली. याबद्दल मी अभिनंदन करते यावेळी असं दमानिया यावेळी म्हणाल्या.

दमानिया यांनी राज यांच्या चौकशीचे स्वागत करतानाच दमानिया यांनी भाजपाच्या घोटाळेबाज नेत्यांवरही कारवाई करावी अशी मागणीही यावेळी केली. सरकारने केवळ त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच भाजपाच्या घोटाळेबाज नेत्यांवरही कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली. प्रवीण दरेकर, मुकुल रॉय हे भाजपामध्ये गेले आणि त्यांच्याविरुद्धची घोटाळ्यांची चौकशी बंद झाली. भाजपाच्या या वॉशिंगमशीनमधून न निघणाऱ्यांची चौकशी होतेय. भाजपाविरुद्ध बोलणारे किंवा जे भाजपामध्ये जात नाहीत म्हणून त्यांच्याविरुद्ध चौकशी करणे चुकीचं आहे असं मत दमानिया यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या