मोठी बातमी : ‘अंनिस’ने केली अरविंद सोनारांच्या दाव्याची पोलखोल…

ARVIND SONAR Anis

नाशिक : देशात कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यानंतर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण करण्यावर भर दिला जातोय. यासाठी खबरदारी म्हणून अनेक नागरिक लस घेत आहेत. मात्र अनेक लोकांनी लस घेतल्यानंतर त्याचे दुष्परिणाम झाले असल्याचे सांगितले आहे. अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नाशिक शहरातील सिडको भागातील अरविंद जगन्नाथ सोनार या ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला चक्क लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्याचा अजब प्रकार घडला आहे. अरविंद सोनार यांनी ९ मार्च रोजी कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आणि त्यानंतर २ जून रोजी दुसरा डोस घेतला आहे.

या सगळ्या प्रकरणाचा पोलखोल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे. अरविंद सोनार यांच्या शरीरावर नाणी, चमचे आणि स्टील वस्तू का चिकटत आहेत यामागील कारण ‘अंनिस’ने सांगितलं आहे.

नाणी शरीरावर चिकटणे हा प्रयोग कोणीही माणूस करून पाहू शकतो. नाणे, उलथन जरासे ओले करून घ्या आणि पोट, दंड, पाठ अशा सपाट भागावर हलकेसे दाबून ठेवा. निर्वात पोकळी निर्माण होऊन जरावेळ अशी वस्तू चिकटून राहते. पाणी सुकले की मात्र पडते, असं महाराष्ट्र अंनिसकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, अरविंद सोनार यांनी ९ मार्च रोजी कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आणि त्यानंतर २ जून रोजी दुसरा डोस घेतला आहे. त्यांच्या मुलाने अशाच प्रकारे कोविशील्ड लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या अंगाला लोखंडी साहित्य चिकटल्याची बातमी एका वृत्तवाहिनीवर बघितली. हे पाहून त्यांनी सहज आपल्या आई वडिलांनावर देखील तसाच प्रयोग करून पाहायला तर आईला असे काही झाले नाही. मात्र वडिलांच्या अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचे यातून समोर आले.

महत्वाच्या बातम्या