तटकरे बंधूंमधील वादाचं नेमकं कारण काय ?

sunil tatkare

मुंबई : महाराष्ट्रातील भाऊबंदकीच्या राजकारणात नवी भर पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू अनिल तटकरे यांच्यातील वाद आता जगजाहीर झाला आहे.

नाराज असलेले अनिल तटकरे यांनी मातोश्रीवर नुकतीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत त्यांचे पुत्र आमदार अवधूत तटकरे हेही होते. विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावण्यास अवधूत उत्सुक आहे असे मानले जाते.

काय आहे वाद?

अवधूत तटकरे आणि सुनील तटकरे यांचे संबंध तणावाचे असल्याचं बोललं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः तटकरे कुटुंबीयांच्या या भांडणात हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण याला फार यश आलं नाही. 2016 ला अवधूत तटकरेंच्या छोट्या भावाने शिवसेनेत प्रवेश केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अवधूत यांनी स्वतःची तयारी सुरु केली असल्याचं बोललं जात आहे.

लोकशाहीतील घराणेशाही भाग एक : तटकरे कुटुंबीय