fbpx

शिवाजी कर्डिले हे जादूची कांडी नसून, ही तर जिलेटीनची कांडी – अनिल राठोड

टीम महाराष्ट्र देशा : शहर दहशतमुक्त करण्याचा आमचा निर्धार असून, आम्ही सत्तेच्या माध्यमातून नगर शहराचा विकास केला आहे, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हे जादूची कांडी नसून, ही तर जिलेटीनची कांडी असल्याची टीका शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केली.

भाजप-कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्याकडे कोणतेच मुद्दे नसल्यामुळे त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसोबत आता कोणाकोणाचे फोटो लागले आहेत, हे भाजपने पहायला हवे, जनतेला ह सर्व समजले आहे. त्यामुळे कोणाला बरोबर घेऊन हे चालले आहेत, हे आता सांगण्याची आवश्‍यकता नाही. असा टोला राठोड यांनी लगावला आहे.

1 Comment

Click here to post a comment