…अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावं लागेल; परिवहन मंत्र्यांचा कर्मचाऱ्यांना इशारा

…अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावं लागेल; परिवहन मंत्र्यांचा कर्मचाऱ्यांना इशारा

anil parab

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कामगारांनी गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. आता यावर राज्य सरकारने तोडगा काढला आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab)यांनी पत्रकार परिषद घेऊन एसटी कामगारांच्या (st bus workers)पगारवाढीची (salary increased) घोषणा केली आहे.

राज्य सरकारने काही प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. आंदोलनाला पाठिंबा देणारे विरोधी पक्षातील नेते भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar ) आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी तात्पुरतं आंदोलन मागे घेतले असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र अद्यापही कर्मचारी आंदोलनावर ठाम असल्याचं कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

मंत्री अनिल परब यांना कर्मचाऱ्यांना उद्या कामावर येण्याचे आवाहन केले आहे. ‘न्यायालयाने गठीत केलेल्या समितीने विलीनीकरणाचे आदेश दिले तर ते आम्ही मान्य करु. संपामुळे एसटीची परीस्थिती अतिशय वाईट झाली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना आम्ही दिलेला निर्णय मान्य असेल ते कामावर येतील. ज्यांना मान्य नसेल, जे संपात राहतील त्यांना कडक कारवाईला सामोरे जावं लागेल’, असा इशारा देखील अनिल परब यांनी दिला आहे.

काल सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. विलीनीकरणाच्या बाबतीत देखील सरकारने भूमिका मांडली. मागण्या मान्य झाल्यानंतर लढाई थांबवायची असते. मात्र काही कर्मचारी कामावर येण्यास तयार आहेत. जे कर्मचारी गावात आहेत त्यांनी आज कामावर यावे आणि जे मुंबईत आलेले आहेत त्यांनी उद्यापर्यंत कामावर यावं, असं आवाहन अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं आहे.

आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किती कामगार कामावर आले कीती नाही, या गोष्टींचा अभ्यास करु, त्यानंतर महामंडळ पुढील निर्णय घेईल. जे कामगार विलीनीकरणावर ठाम आहेत. त्यांना मला सांगायच आहे मी वारंवार सांगत आहे ही मागणी हायकोर्टाने नेमलेल्या समितीसमोर आहे. त्याला 12 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे. त्यामुळे 12 आठवडे संप करणे हे परवडणार नाही. आर्थिक परिस्थिती वाईट असताना देखील सरकारने निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहनही यावेळी अनिल परब यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या: