नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनिल परबांचे सडेतोड उत्तर

नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनिल परबांचे सडेतोड उत्तर

नारायाण राणे

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार (MVA) येण्यापूर्वी जो काय नाट्यमय सत्तांतरणाचं प्रकरण घडले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर सर्वचजण चकित झाले होते. मात्र नुकतेच महाविकास आघाडी सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. हे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून ‘हे सरकार टिकणार नाही’ असा अनेकदा दावा करण्यात आला.

नुकतेच भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडीचं सरकार पडणार, असं पुन्हा एकदा विधान केले. यावर आता अनिल परबांनी (Anil Parab) सडेतोड उत्तर दिले आहे. अनिल परब म्हणाले, नारायण राणे काय म्हणतात याच्यावर सरकार चालत नाही. सरकार संख्याबळावर चालतं आणि आज महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ आहे आणि त्यामुळे हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणारच, असे म्हणत परबांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?

लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. माझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे ती आत्ताच बाहेर सांगायची नाही. एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. अशा ठिकाणी काही बोललो तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

पुढे राणे म्हणाले, जो व्यक्ती आजारी आहे. आणि बेडवर आहे त्या व्यक्तीवर नाव घेऊन बोलणं योग्य नाही. तसेच महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षांचं आघाडीचं सरकार आहे त्याचं आयुष्य जास्त नसल्याचाही सूचक इशारा राणेंनी दिला.

महत्वाच्या बातम्या: