मुंबई : शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी बंड करून भाजपशी हात मिळवणी केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाले. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यामुळेच सध्या शिवसेनेमध्ये ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहेत. तसेच शिवसेना नक्की कुणाची याच्यावरून वादही सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना नेते अनिल परब म्हणाले कि, शिवसेना ही केवळ बाळासाहेब ठाकरे यांची आहे. ही इतर कुणाची प्रॉपर्टी असूच शकत नाही. शिवसेनेला कुणीही हात लावू शकत नाही
पुढे परब असेही म्हणाले की, “पैश्याची लालच ही सर्वात मोठी लालच आहे. पण थू… तुमच्या पैश्यावर. प्रेम तुम्हाला पैशाने मिळणार नाही. पैसे आज ना उद्या संपतील पण जनतेचं हे प्रेम कधीही संपणार नाही. शिवसेनेची सदस्य संख्या ही ४० लाख इतकी आहे. त्यातून गेलेले ४० जण म्हणतात की शिवसेना आमची आहे. पण तस नाही, शिवसेना फक्त बाळासाहेबांचीच आहे”.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<